सुस्वागतम्...सुस्वागतम्...सुस्वागतम्... माझ्या blog वर सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत...शैक्षणिक माहितीचा स्त्रोत म्हणजे माझा blog

शिक्षक पात्रता परीक्षा (TET)

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात अधिक माहिती 

शासन निर्णय -

१. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद मार्गदर्शन 

२. शासन निर्णय दि. १३ फेब्रुवारी २०१३ 

३. शासन निर्णय दि. ६ मार्च २०१३ 

४. शासन निर्णय दि. २० ऑगस्ट २०१३: 

५. शासन निर्णय दि.२३ ऑगस्ट २०१३ 

६. शासन निर्णय दि.१५ ऑक्टोबर २०१३ 

७. शासन निर्णय दि.१४ नोव्हेंबर २०१३ 

८. शासन निर्णय दि.१८ मार्च २०१४ 

९. शासन निर्णय दि.०९ सप्टेंबर २०१४ 

१०. शासन निर्णय दि.०९ सप्टेंबर २०१४ 

११. शासन निर्णय दि.०३ डिसेंबर २०१४



अर्हता -
“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या तरतूदी लक्षात घेता, राज्यामध्ये इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता १ ली ते ८ वी करिता) खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे. 

१.१) इयत्ता पहिली ते पाचवीकरिता:- 

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- 

(i) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 

किंवा 

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान ४५ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो). 

किंवा 

(iii) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची, चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण 

किंवा 

(iv) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षाची पदविका (विशे शिक्षण) 

किंवा 

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो), 

(vi) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्रमांक टसीएम-२००९/३६/०९/माश-४, दि. १० जून, २०१० अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्दकिय सेवागटातील Crench and Pre School Management परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्रात दोन वर्षाची पदविका 

ब) शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET) 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण. 

१.२) इयत्ता ६ वी ते ८ वी करिता- 

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 

किंवा 

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ४५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी (Bachelor in Education) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 

किंवा 

(iii) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण 

किंवा 

(iv) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed. उत्तीर्ण 

किंवा 

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक वर्षाची B.Ed. (Special Education) पदवी उत्तीर्ण. 

किंवा 

(vi) कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्यकीय सेवा गटातील Crench and Pre School Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील एक वर्षाची पदवी. 

आणि 

ब) शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T) 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा